जागतिक किर्तीचे संगीतकार ए. आर. रेहमान, सुपरस्टार अरविंद स्वामी, विजय सेतुपती, आदिती राव हैदरी, महेश मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव अशी बडी कलाकार मंडळी “गांधी टॉक्स” सिनेमात आहेत. आणि दिग्दर्शक आहेत कोकणातील किशोर पांडुरंग बेळेकर.

हा चित्रपट अद्भुत आहे. थिएटरात जाऊनच पाहायला हवा, असं सर्व समीक्षकांनी लिहिलं आहे.
राष्ट्रीय पातळीवर बहुचर्चित असलेल्या या चित्रपटाचा स्पेशल शो चिपळुणात रोटरी क्लबच्यावतीने आयोजित केला आहे.
(विशेष सहकार्य – रेडिओ कोकण 90.4 FM)

गांधी टॉक्स हा किशोर बेळेकर यांचा बहुचर्चित असा चित्रपट असून चाळीस वर्षानंतर बनलेला हा पहिला मूक चित्रपट आहे. असे असले तरी या चित्रपटात एकूण तीन गाणी आहेत. सदर गाणी मराठी, हिंदी, तमिळ, कन्नड आणि तेलुगु भाषेत आहेत. ए. आर. रहमान यांनी पहिल्यांदाच मराठी गाण्यांना संगीत दिले आहे.
या चित्रपटाचा मराठी गाणी असलेला पहिलाच शो रोटरी क्लब यांच्यावतीने एम. के. थिएटर येथे आयोजित केला आहे.

कधी ? – शुक्रवार दिनांक १३ मार्च, दुपारी ३ वाजता
कुठे? – अतिथी थिएटर, शिवाजी नगर

या शोसाठी स्वतः दिग्दर्शक किशोर पांडुरंग बेळेकर उपस्थित रहाणार आहेत. सिनेमानंतर प्रेक्षकांना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

या विशेष शोसाठी आपण मान्यवर निमंत्रित आहात.
प्रेक्षक संख्या मर्यादित असल्याने आपण येत असल्याचं कृपया कळवावं ही विनंती.

धन्यवाद !

संपर्क-

उमेश कुचेकर
+91 96372 51978