पनवेल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल तालुका अध्यक्षपदी सुजित सोनवणे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे आणि कार्यक्रम वेळोवेळी आपल्या संघटनेत निष्ठेने राबवावी असे सोनवणे यांना दिलेल्या पत्रात राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यापूर्वी सुजित सोनवणे यांनी मनसे, तालुका उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. सुजित सोनवणे यांची मनसे, पनवेल तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे मित्र, हितचिंतक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी सुजित सोनबणे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे आभार व्यक्त करत पनवेल तालुक्याचा विकास करण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
सुजित सोनवणे यांची मनसे पनवेल तालुकाध्यक्षपदी निवड
