चिपळूण : वालोपे गणेशवाडी येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते विकास तथा अबू मयेकर यांचे दि. 15 मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. निधन समयी ते 42 वर्षांचे होते. वालोपे गणेशवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील विविध उपक्रमांमध्ये ते सक्रिय सहभाग घेत असत. अत्यंत मनमिळावू व परोपकारी असा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच ग्रामस्थ, नातेवाईक यांनी मयेकर कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात आजी, आई, पत्नी, 3 मुली 1 मुलगा, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.
सामाजिक कार्यकर्ते विकास मयेकर यांचे निधन
