खेड : दि. २ ते ६ एप्रिल २०२६ या कालावधीत नाशिक (सिन्नर) येथे होणाऱ्या ७३व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा पुरुष व महिला संघ जाहीर करण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्हा असोसिएशनच्या वतीने निवड झालेल्या पुरुष व महिला खेळाडूंचे तसेच दोन्ही संघांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पुरुष संघात खेड तालुक्यातील दोन खेळाडूंची, तर महिला संघात पाच खेळाडूंची निवड झाली आहे. काळकाई कला क्रीडा केंद्र, भरणे संघाचा अष्टपैलू खेळाडू अथर्व धुमाळ याची कर्णधारपदी, तर त्याच संघातील सूरज राठोड याची संघात निवड झाली आहे.
महिला संघामध्ये खेड तालुक्यातील अनिकेत स्पोर्ट्स क्लब, भरणे संघातील कु. समरीन शौकत बुरोंडकर, कु. तस्नीम समद बुरोंडकर, कु. सिद्धी राजेंद्र चाळके, कु. प्रतीक्षा चव्हाण व सलोनी महाडिक या पाच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या पाच महिला खेळाडूंव्यतिरिक्त मुग्धा शिर्के, चिन्मयी ढगळे, गौरी जाधव, वैष्णवी जोगळेकर, श्रिया हुंबरे, अनुराधा भिसे, श्रेया दुधाळे, सानिका मांडवकर, सिमल चव्हाण यांची निवड झाली असून प्रशिक्षकपदी भूषण कुळकर्णी, तर व्यवस्थापकपदी जान्हवी हुंबरे यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच पुरुष संघामध्ये कर्णधारपदी निवड झालेल्या खेडच्या अथर्व धुमाळ व सूरज राठोड या खेळाडूंसह चिपळूणचे अमरसिंग कश्यप, श्रेयस शिंदे, निलेश शिंदे, ओम शिर्के, अभिषेक शिंदे, संकेत घडशी, शुभम कदम व शैलेश येडगे, तर संगमेश्वरचा आविष्कार पालकर, रत्नागिरीचा वेद पाटील व ऋषिकेश साळुंखे आणि दापोलीचा श्री. संकुलकर यांची निवड झाली असून प्रशिक्षकपदी संतोष शिर्के, तर व्यवस्थापकपदी सुशांत सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे खेड तालुका कबड्डी असोसिएशनतर्फे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
