चिपळूण (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेअंतर्गत तालुक्यातील पोफळी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते दिलीप गणपत मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

चिपळूण तालुक्यातील पूर्व विभागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पोफळी ग्रामपंचायत सुपरिचित आहे. कोयना प्रकल्पामुळे पोफळी हे गाव अनेकविध गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे. अशा लोकसंख्येने मोठे असणाऱ्या गावच्या तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी नुकतीच ग्रामपंचायतींमध्ये बैठक झाली.या बैठकीत सर्वानुमते दिलीप मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गावामध्ये शांतता आणि सलोखा निर्माण करण्यात गावातील तंटा मिटवण्यामध्ये या समितीचे महत्त्वाचे योगदान असते. त्यामुळे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दिलीप मोहिते यांच्यासारख्या समंजस व्यक्तीची निवड झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. दिलीप मोहिते हे चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक संरक्षक समितीच्या न्यायदान कमिटीचे माजी अध्यक्ष तसेच तिसगाव विभागाचे विद्यमान उपाध्यक्ष, पोफळी ग्राम शाखेचे अध्यक्ष अशा विविध पदांवर ते कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात अत्यंत सक्रिय पण येथे कार्यरत आहेत.

यावेळी पोफळी गावचे सरपंच उस्मान भाई सय्यद, चिपळूण पंचायत समिती सदस्य स्नेहा साळवी, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष किसन पवार, मैनुद्दीन सय्यद , प्रतिष्ठित नागरिक श्रीराम पवार , चिमाजी पवार, दिनकर पवार, संजय सपकाळ, संजय चव्हाण,शंकर सकपाळ, मानसी जाधव, भाई पवार, मदन भाई, महिला वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड झाल्यानंतर त्यांचे मान्यवरांचा हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.