गुहागर : बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर शाखा क्रमांक 55 या महिला मंडळाच्या माजी सचिव, माजी अध्यक्षा तसेच माजी अंगणवाडी सेविका श्रीमती शैलजा सुर्वे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 92 व्या वर्षी दि. 24 मार्च रोजी रात्री 8.15 वाजता निधन झाले.
त्यांच्या पश्चात 3 मुलगे, 2 मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे, तरी त्यांचा पुण्यनुमोदन आणि शोकसभा रविवार दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता त्यांच्या राहत्या घरी चिंद्रवळे बौद्धवाडी येथे करण्याचे योजिले आहे.