पेण (प्रशांत पोतदार): पेण येथील भारत गॅस वरदान येथून मुंबई गोवा मार्गावरून वडखळ डोलवी येथे ग्राहकांना गॅस सिलिंडरचा वितरित करण्यासाठी निघालेल्या छोट्या टेम्पोच्या इंजिनमध्ये अचानक आग लागल्याची घटना पेण वाशी नका येथे गुरुवारी १० वाजण्याच्या सुमारास घडली, असून या प्रसंगी लागलेल्या आगीत एका सिलिंडरचा स्फोट झाल्याचे समजून येत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार गाडी मध्ये ४८ भरलेले गॅस तर ४ रिकामे गॅस सिलेंडर होते, यातील ९ सिलिंडरचा स्फोट झाला तर लागलेल्या आगीत टेम्पोचे नुकसान झाले आहे. कुठली ही जीवित हानी झाली नाही.पेण नगरपालिका फायर ब्रिगेड,फायर टीम नागोठणे रिलायन्स इंडस्ट्रीज तसेचजेएसडब्ल्यू फायर ब्रिगेड टीमने आगीवार नियंत्रण मिळवले आहे.यावेळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप बागुल,निरीक्षक विक्रम नवरखेडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर,पोलीस स्टाफ तसेच वाहतूक शाखा अलिबागचे निरीक्षक  भुजबळ हे तत्पर घटना स्थळी पोहचून दुर्घटनेवर तत्काळ नियंत्रण मिळविले.

—————————

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY