दापोली: फुटबॉल क्लब आयोजित पितांबरी DSL-2026 स्पर्धेत दापोली सॉकर्स पुन्हा विजयी.पितांबरी दापोली सुपर लीग फुटबॉल स्पर्धा १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान दापोली फुटबॉल क्लब यांनी दापोली येथील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले होते. यामध्ये डॉ. मुनिर सरगुरो यांचा दापोली सॉकर्स,डॉ. रविंद्र टेटांबे यांचा इलेव्हन टायगर्स, डॉ. संजिव मदान यांचा इशान एफसी, हर्ष तोडणकर यांचा सनब्लिस स्ट्रायकर्स, स्वर्णिम हरवंदे यांचा दापोली टायटन्स FC आणि विनय पोतदार यांचा राणा एफसी हे सहा संघ सहभागी झाले.
इशान FC आणि दापोली सॉकर्स FC यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत दापोली सॉकर्स FC ने २-० गोल फरकाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात दापोली सॉकर्सचा विंगर झुहैर दाभोळकरने दोन गोल करून प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळवला. फैझान पुरकर पुरस्कृत वैयक्तिक पुरस्कारांमध्ये गोल्डन बुट साहिल लोळगे, गोल्डन ग्लोव्ह अंकित शर्मा, बेस्ट डिफेंडर प्रज्वल, बेस्ट स्ट्रायकर अमान कुलाबकर, इमरजिंग प्लेअर ओजस मेहता आणि बेस्ट मिड फिल्ड जय म्हस्के या खेळाडूंना देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर संकेत मेहता पुरस्कृत इमरजिंग गोलकिपर ठरला रोशन बेलोसे.
पितांबरी दापोली सुपर लीग स्पर्धेच्या आयोजनात हिमांशू किर्वे, संवेद झगडे, मिहिर झगडे,साहिल साळवी, स्मित तोडणकर, साकिब कासू, शार्दुल आंबेकर, फरहान कुलाबकर,अलिश साळगावकर,पार्थ कदम आणि रोहित जाधव यांच्यासह अनेक खेळाडूंचा सहभाग उल्लेखनीय होता. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मिलिंद खानविलकर अध्यक्ष, ऋषिकेश मढव उपाध्यक्ष , विनोद म्हस्के सचिव आणि वरुण महाजन खजिनदार दापोली फुटबॉल क्लब यांचे योगदान लाभले.
त्याचबरोबर सोशल मीडियाची जबाबदारी हिमांशू किर्वे आणि संवेद झगडे यांनी सांभाळली.
