चिपळूण : सामाजिक क्षेत्रात समाजकार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल धामापूर गावचे ज्येष्ठ समाजसेवक संभाजी महाडिक यांना नवराष्ट्र नवभारत समूहाचा अत्यंत सन्मानाचा ज्येष्ठ समाजसेवक पुरस्कार रत्नागिरी सिंधुदुर्ग सन्मान सोहळ्यात शनिवारी चिपळूण मधील अतिथी सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
आपला पारंपरिक चणे-शेंगदाणेचा व्यवसाय सांभाळून महाडिक यांनी समाज कार्य सुरु ठेवले आहे. १९८६ मध्ये ते गावी गेले. तिथे त्यांनी किराणा मालाचे दुकान व पीठाची गिरण चालवली. याच दरम्यान, गावातील विकासाकडे त्यांचे लक्ष गेले. गावात वीज आणणे, रस्ते, पाणी योजना यासाठी त्यांनी प्रयत्न केले. गरजू रुग्णांना रुग्णालयात नेणे व त्यांच्यासाठी थोडाफार खर्च करणे या सेवेतही त्यांनी स्वतः झोकून दिले. स्व. गोविंदराव निकम यांचा परिस्पर्शही त्यांना लाभाला. धामापूरसारख्या ग्रामीण भागातील मुलांना गावाजवळ शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपली स्वमालकीची जागा विनामूल्य शाळेला देऊन शाळा सुरु केली. साधी राहणी पण उच्च विचारसरणी, शेतीची आवड असल्याने गावात शेती करणे, जोडीला आंबा, काजूची फळलागवड करुन शेतकरी, बागायतदारांना ते प्रवृत्तही करत आहेत.अशा या त्यांच्या कार्यामुळे नवभारत समूहाने त्यांना सन्मानित केले आहे.चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.आ.शेखर निकम यांनीही संभाजी महाडिक यांचे विशेष अभिनंदन केले.या सन्मान सोहळ्याला चिपळूणचे आमदार शेखर निकम,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव,सुभाषराव चव्हाण,संजय मलमे,नवभारतचे महा व्यवस्थापक सचिन फुलपगार,सौ.स्वप्ना यादव,उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर,सौ.स्मिता चव्हाण,दापोली विद्यापीठाचे संतोष सावर्डेकर,अभिनेत्री साक्षी गांधी,नगरसेवक शुभम पिसे,संभाजी महाडिक,मीना महाडिक,उमेश महाडिक, नेहा महाडिक,अमेय महाडिक,सेजल महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्याबद्दल संभाजी महाडिक यांचा ज्येष्ठ समाजसेवक पुरस्काराने गौरव
