चिपळूण : शहरातील प्रतिष्ठित व्यापारी शरद, नितीन आणि सचिन खेराडे यांच्या मातोश्री श्रीमती प्रमिला महादेव खेराडे यांचे शनिवार दि. ४ एप्रिल रोजी रात्री वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
रविवारी सकाळी उक्ताड स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखा नितीन खेराडे यांच्या त्या सासूबाई होत. त्यांच्या पश्चात तीन पुत्र, एक विवाहित कन्या, सुना, जावई, नातवंडे,पतवंडे व खेरडे कुटुंबीय असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.