मुरुड जंजिरा ( सुधीर नाझरे ) मुरूड जंजिरा नगरपालिकेच्या सभागृहात पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी सदस्यांचे स्वागत करुन सभेच्या नोटीशीचे वाचन करण्यात आले.यावेळी समित्या कीती असाव्यात त्यावेळी विरोधकांकडून शिंदे शिवसेना पक्षांचे गटनेता -पांडुरंग आरेकर यांनी सांगितले की अध्यक्ष पकडुन ६ समिती असाव्यात तर सत्ताधारी यांच्या कडुन अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तमीम ढाकम यांनी ४ समित्या असाव्यात यावर पिढासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी-सचिन बच्छाव यांनी सांगितले की निवडणूक घ्याची आहे का असे सुचवले सत्ताधारी यांच्या कडे संख्या बळ नसल्याने निवडणूक न घेता विरोधकांकडून सुचविले प्रस्ताव मान्य करुन अध्यक्ष पकडुन ५ समित्या घेण्याचे ठरविले.तद्नंतर पाच विषय समित्यांवर ४ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अजितपवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा आराधना मंगेश दांडेकर ह्या स्थायी समितीच्या अध्यक्षा – आराधना मंगेश दांडेकर असणार आहेत.तर
शिंदे शिवसेना पक्षांचे उपनगराध्यक्ष – विरेंद्र दत्तात्रेय भगत यांच्या कडे आरोग्य व शिक्षण समिती सभापती तर. सदस्य अंकिता दिपेश गुरव,ॲड.रुपेश शंकर पाटील, आदेश हरिश्चंद्र दांडेकर,तमिम ढाकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बांधकाम व दिवाबत्ती समिती सभापती -यास्मिन जाहिद कादिरी, तर सदस्य ॲड.रुपेश शंकर पाटील, नितिन नामदेव आंबुर्ले, आदेश हरिश्चंद्र दांडेकर, मनोज हरिश्चंद्र भगत, यांची बिनविरोध निवड करण्यात आली पाणी पुरवठा व जलनि:सारण समिती सभापती – पांडुरंग कृष्णा आरेकर तर सदस्य मनिष मोहन विरकुड,विजय शंकर पाटील,रुपेश रमेश पाटील,प्रीती प्रविण चौलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नियोजन व पर्यटन विकास समिती सभापती – रुपेश रविंद्र रणदिवे, तर सदस्य वैदेही प्रकाश आरेकर, श्रीकांत नारायण खोत, श्रध्दा चंद्रकांत अपराध, प्रमिला सुभाष माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समिती सभापती – नगमाना इम्तियाज खानजादे उप सभापती- सुगंधा पांडुरंग मकु, तर सदस्य अंकिता दिपेश गुरव,देवायानी देवेंद्र गुरव, प्रांजली चेतन मकु यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिढासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी जाहीर केले.या पाच ही समित्यांवर शिंदे शिवसेना पक्षांचा भगवा वर्चस्व दिसून आले. यावेळी नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी-नंदकुमार आंबेतकर, प्रकाश आरेकर,सुदेश माळी,सतिष जंजिरकर ,निलेश शेंडगे, आदिंसह उपस्थित हो
▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
