देवरुख : संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अ. प. गट) युवक अध्यक्षपदी पाटगांव येथील प्रतीक सुनील साळवी यांची निवड करण्यात आली आहे.

प्रतीक साळवी हे कुंभार समाजाचे विभागीय अध्यक्ष असून धडाडीचे कार्यकर्ते असूनआम. शेखर निकम यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. तालुक्यात विविध मंडळाचे माध्यमातून सामाजिक कामात पुढाकार घेऊन सहभागी असतात. त्यांचा जनसंपर्क उत्तम असून त्यांच्या मितभाषी स्वभाव व अडीअडचणीला धावून जात मदत करण्यासाठी मोठा सहभाग असतो.संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रतीक यांची युवक तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. यावेळी अजिंक्य आंब्रे. जिप सदस्य सुशील भायजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष हनीफ भाई हरचिरकर. संघटक बाळू ढवळे युवक काँग्रेसचे मावळते तालुकाध्यक्ष पंकज पुसाळकर उपसभापती प्रफुल बाईत. पं. स. सदस्य मंगेश बंडागळे आरुषी घवाली आदीसह युवा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते