सावर्डे (चिपळूण) : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री पॉलिटेक्निक, सावर्डे येथे आयोजित “S. Creators 2026” प्रोजेक्ट एक्झिबिशन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे उद्घाटन दैनिक सागरचे ज्येष्ठ पत्रकार व जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूणचे अध्यक्ष सुनील साळवी, यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अमोल धांडे (मेकॅनिकल विभागप्रमुख, गव्हर्मेंट पॉलिटेक्निक रत्नागिरी) यांनी मार्गदर्शनपर भाषण करून विद्यार्थ्यांना तांत्रिक क्षेत्रात नवकल्पनांचा ध्यास घेण्याचे आवाहन केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखर निकम , कार्याध्यक्ष, सह्याद्री शिक्षण संस्था अनिरुद्ध निकम , प्राचार्य मंगेश भोसले ,उपाध्यक्ष प्रशांत निकम ,चित्रकार प्रकाश राज शिर्के ,अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड अनुजाराजे भोसले तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.


या एक्झिबिशनमध्ये एकूण सात विभागांनी सहभाग घेतला होता—ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर, आयटी आणि आय.डी. विभाग. विद्यार्थ्यांनी एकूण 55 प्रोजेक्ट्स सादर करून आपल्या कल्पकतेची झलक दाखवली.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून एमबीए महाविद्यालयाचे प्राध्यापक मयुरेश लोनुष्टे ,आयटीआय अधिव्याख्याताप्रशांत राजेशीर्के आणि ज्युनिअर कॉलेज सावर्डे अधिव्याख्याता सिद्धेश जाधव यांनी काम पाहिले.
यामध्ये “Software Based College Management System” या प्रोजेक्टची सर्वोत्कृष्ट प्रोजेक्ट म्हणून निवड करण्यात आली. तर “Automatic Human Height Measurement” आणि “Permeable Concrete” या प्रोजेक्ट्सना विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभास गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर प्रणवराजे भोसले तसेच सृष्टी ज्ञान सहाय्यक पर्यावरण संस्था संचालक प्रशांत शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व समन्वयक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या तांत्रिक कौशल्यांना वाव मिळून भविष्यातील संधींसाठी प्रेरणा मिळाली.