रायगड : जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धा २०२६ मोहोपाडा येथील जनता विद्यालय शाळेचा सभामंडपात मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. जिल्ह्यातील विविध भागांतून सहभागी झालेल्या दोनशेहून अधिक खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
अत्यंत चुरशीच्या लढतींमध्ये अटॅकर्स तायक्वांदो अकॅडमीने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले.या स्पर्धेचे उदघाटन डाॅ.पारनेरकर महाराज विद्यालयाचे अध्यक्ष तुळशीदास पाटील आणि सरपंच उमाताई मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धेंचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक: अटॅकर्स तायक्वांदो अकॅडमी ,द्वितीय क्रमांक: गुरुकुल तायक्वांदो अकॅडमी ,तृतीय क्रमांक: अगस्तू तायक्वांदो अकॅडमी , चतुर्थ क्रमांक: किंग फायटर क्लब (पोलीस हेडकॉटर) , पाचवा क्रमांक: तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी .या स्पर्धेचे आयोजन तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष संदीप सुदाम मुंढे, सचिव सचिन माळी आणि खजिनदार रोहित तानाजी सिनलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते .त्यांच्या प्रभावी नियोजनामुळे स्पर्धा वेळेत आणि अत्यंत शिस्तपूर्ण पद्धतीने पार पडली.
