लांजा (गोविंद चव्हाण) : गगनबावडा येथे दि. २४ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत प्रथम काकड आरती, भजन, विष्णुसहस्रनाम, गीतावाचन, तुकाराम गाथा भजन, प्रवचन, माऊली हरिपाठ, कीर्तन, शेजारती, जागर तसेच दुपारी व रात्री महाप्रसाद, ध्वजपूजन, ग्रंथपूजन, वीणा, टाळ, पखवाज असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

दि. २४ रोजी सकाळी पादुका आगमन दिंडी सोहळा गगनबावडा एस.टी. स्टँडपासून ते गगनगिरी महाराज यांच्या मठापर्यंत भव्य-दिव्य अशी दिंडी मिरवणूक काढण्यात येणार आहे. प्रवचन ह.भ.प. एकनाथ महाराज नामदास व कीर्तन ह.भ.प. तुकाराम महाराज पवार यांचे होणार आहे. दि. २५ रोजी प्रवचन ह.भ.प. नामदेव महाराज दळवी यांचे, तर कीर्तन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास यांचे होईल. दि. २६ रोजी काल्याचे कीर्तन ह.भ.प. तुकाराम महाराज पवार यांचे होईल. तसेच रात्री ९ वाजता वारकरी युवक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे सेवा पुरस्कार, मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार, भजनसेवा, मृदंग सेवा, कीर्तन सेवा, सेवारत्न, समाजसेवा, वारकरी रत्न असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतील.