चिपळूण : शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात आदिशक्तीच्या भक्तीचा जागर, महिलाशक्तीप्रती श्रद्धा आणि समाजाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना अशा भक्तिमय वातावरणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार तथा शिवसेना नेते-सचिव मा. श्री. विनायकजी राऊत यांचा दरवर्षीप्रमाणे चिपळूण तालुक्यातील देवीदर्शन दौरा उत्साहात पार पडला. या दौऱ्यात विविध गावांतील देवी मंदिरांना भेट देत त्यांनी आदिशक्तीचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्रावर घोंगावत असलेल्या संभाव्य दुष्काळी संकटातून बळीराजाची सुटका व्हावी, शेतीला नवसंजीवनी मिळावी आणि सर्वसामान्य जनतेसह पशुधनाच्या वाट्याला आलेले संकट दूर व्हावे, अशी भावपूर्ण प्रार्थना त्यांनी देवीचरणी केली.
नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून स्त्रीशक्तीचा सन्मान, सामाजिक एकात्मता आणि सामूहिक श्रद्धेचा जागर आहे. याच भावनेतून पार पडलेल्या या दौऱ्याला शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, ग्रामस्थ आणि महिलावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विविध ठिकाणी देवीदर्शन, भक्ती आणि जनसंपर्काचा अनोखा संगम
मा. विनायकजी राऊत यांच्या देवीदर्शन दौऱ्याची सुरुवात सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता गोवळकोट येथील करंजेश्वरी मंदिरातील दर्शनाने झाली. त्यानंतर परशुराम येथील धावजी मंदिर व शिवगर्जना सेवा मंडळ, वालोपे येथील झोलाई मंदिर आणि कुंभार्ली येथील महाकाली मंदिर येथे त्यांनी दर्शन घेतले.
सायंकाळी ८ वाजता दादर येथील रामवरदायिनी मंदिर, मोरवणे येथील सुकाई मंदिर आणि दळवटणे येथील कान्होबा मंदिर येथे भेट देण्यात आली. पुढे रात्री १०:३० वाजता काविळतळी येथील ओंकार मित्र मंडळाच्या देवीचे दर्शन, मार्कंडी येथील भैरी भवानी मित्र मंडळाच्या देवीचे दर्शन आणि चिपळूणमधील जुने कालभैरव मंदिर येथे दर्शन घेण्यात आले.
रात्री ११:३० वाजता वडनाका येथील एकविरा मंदिर, बाजारपेठेतील देवी आणि पाग येथील सुकाई मंदिर व आज मंगळवार, दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी भवानी माता मंदिर, सावर्डे येथे देवीदर्शनाने या दौऱ्याची सांगता झाली. विविध मंदिरांतील धार्मिक वातावरण, भाविकांचा उत्साह आणि शिवसैनिकांचा सहभाग यामुळे संपूर्ण दौऱ्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
‘महाराष्ट्रावरील आसमानी संकट दूर कर!’ – विनायक राऊत यांचे देवीचरणी साकडे
दौऱ्यादरम्यान सध्याच्या पावसाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करताना मा. विनायकजी राऊत म्हणाले,
“आज अत्यंत खेदाने सांगावे लागत आहे की, पाऊस नसल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे आणि शेती करपत चालली आहे. कोकणात भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते मात्र आज केवळ कोकणच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
भविष्यात ही परिस्थिती अधिक बिकट झाली, तर अन्नधान्याची टंचाई, पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. हे संकट केवळ माणसांपुरते मर्यादित नसून मुक्या जनावरांच्या जीवनावरही त्याचे परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी बांधवांच्या भविष्याची चिंता मनात आहे.
म्हणूनच आज आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना केली आहे की, महाराष्ट्रावर आलेले हे आसमानी संकट दूर कर. संपूर्ण मानवजातीला आणि प्राणिमात्रांना भविष्यातील संभाव्य संकटांचा सामना करण्याचे बळ दे. शेतीमातीवर आलेले संकट दूर होऊ दे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती व समृद्धी निर्माण होऊ दे.
आपण आम्हाला दर्शनासाठी आमंत्रित करून जो मान-सन्मान दिलात, त्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.”
त्यांच्या या भावपूर्ण प्रार्थनेतून शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि पशुधनाविषयीची चिंता व्यक्त झाली. धार्मिक श्रद्धेबरोबरच शेती, पाणी, अन्नसुरक्षा आणि ग्रामीण जीवनाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरजही या निमित्ताने अधोरेखित झाली.
शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थांची उपस्थिती
या दौऱ्यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, भारतीय कामगार सेना सरचिटणीस उदय शेट्ये, विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव (बाळा) कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका समन्वयक सुधीरभाऊ शिंदे, तालुका संघटक राजुशेठ देवळेकर, शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम, गटनेता तथा नगरसेवक व उपशहर प्रमुख मिथिलेश (विकी) नरळकर, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, महिला आघाडी शहर संघटक वैशाली शिंदे, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, शहर सचिव प्रशांत मुळये, माजी नगरसेवक मनोज शिंदे, उपतालुका प्रमुख सचिन शेट्ये, संदीप राणे, उपशहरप्रमुख राजन खेडेकर, राजू विखारे, विशाल बेचवडे, विभागप्रमुख रोशन आंब्रे, संकेत शिंदे, सुरेंद्र (बाबा) शिंदे, अजिंक्य कोलगे, किशोर सातपुते, संतोष मिरगल, बंधू कदम, उपविभागप्रमुख संदीप चव्हाण, नवीनचंद्र किल्लेकर, रुपेश तांबडे, शाखाप्रमुख विवेक सुर्वे, महेंद्र मेटकर, संतोष भुवड, हनुमंत चव्हाण, अजित लाड, अशोक चव्हाण, नयन कुळे, विष्णू चव्हाण, समीर माळी, ऋषिकेश हरवडे, युवासेना उपतालुका अधिकारी भूपेश सावर्डेकर, युवासेना उपशहर अधिकारी आकाश कदम, ओंकार गायकवाड, जियाद चिकटे, युवासेना विभाग अधिकारी राहुल गुरव, आयुष कुबडे, रेहान पवार, शुभम शिंदे, आर्यन मिरगल, आर्यन भुवड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच माजी उपसरपंच संदीप कोलगे, शिवसैनिक गौरेश कोलगे, गणेश कोलगे, जयेंद्रशेठ शिंदे, महादेव बुवा खेतले, किशोर गुजर, महेंद्र काणेकर, विशाल पिलवलकर, बाबू निर्मळ, विनायक वास्कर, विजय सावंत, आदर्श कदम आयुष जाधव आणि योगेश्वर राऊत यांच्यासह विविध ठिकाणचे ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नारीशक्तीचा जागर आणि समाजाच्या सुख-समृद्धीची कामना
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पार पडलेल्या या देवीदर्शन दौऱ्यात श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि जनतेच्या प्रश्नांविषयीची संवेदनशीलता यांचा संगम पाहायला मिळाला. आदिशक्तीच्या उपासनेतून नारीशक्तीचा सन्मान करण्याबरोबरच शेतकरी, ग्रामीण समाज आणि पशुधनाच्या भवितव्याविषयी व्यक्त झालेली चिंता या दौऱ्याचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली.
महाराष्ट्रावरील संभाव्य दुष्काळी संकट दूर व्हावे, बळीराजाच्या शेतात पुन्हा हिरवाई नांदावी, पाणी-चारा आणि अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ नये आणि जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, हीच आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना!
