रोहा ( अल्ताफ चोरडेकर ) : रोहे तालुक्यातील तबलीग जमातीचा केंद्र असलेल्या शहरातील जामे मस्जिद रोहा खालचा मोहल्ला या संस्थेच्या त्रेवार्षिक निवडणुका रविवारी १९ एप्रिल रोजी शांततेत पार पडल्या.
या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत रेवा संस्थेचे अध्यक्ष रियाज शेटे व माजी नगरसेवक जुबेर चोगले यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या शेटे /चोगले पॅनलच्या सदस्यांनी विजयश्री खेचून आणून या निवडणुकीत दणदणीत विजय मिळावीला.या निवडणुकीत ४२३ पैकी २६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.तर ५ मतपत्रिका बाद ठरली.तर एकूण ६१.०७ टक्के मतदान झाले.
या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जाफर येरुणकर तर सहकारी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक मन्सूर दापोलकर व उस्मान कागदी, सलीम उलडे आदी जणांनी काम पाहिले.यावेळी जामे मस्जिद जमातचे मावळते अध्यक्ष हाफिज एजाज किरकिरे, मावळते सचिव अनिस मोरबेकर आदी मान्यवर उपस्थित होते..