लोटे :- खेड तालुक्यातील लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित क्रीडा सप्ताहाची सांगता “गो ग्रीन” मॅरेथॉन ने झाली. वर्धापन दिनानिमित्त आयोजित क्रीडा सप्ताहामध्ये हॉलीबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम,बुद्धिबळ, वक्तृत्वस्पर्धा, गीत गायन स्पर्धा इत्यादी स्पर्धा औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांसाठी भरवल्या होत्या.
रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित क्रीडा सप्ताहाची सांगता “गो ग्रीन”या पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेने झाली. लोटे परशुराम उद्योजक संघटना औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामाच्या तणावातून थोडा मोकळा श्वास घेता यावा याकरिता वर्धापन दिनाच्या वेळेस विविध स्पर्धा घेते. यामध्ये हॉलीबॉल, कबड्डी,बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम,बुद्धिबळ,अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेऊन कर्मचाऱ्यांच्या अंगी असलेक्या कला व क्रीडांगण गुणांना वाव देते. या स्पर्धांमधून विजेते संघ आणि विजेते स्पर्धक यांना दिनांक २७ जानेवारी रोजी वर्धापन दिनाच्या समारंभात मान्यवरांचे हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम २७ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता उद्योग भवन लोटे येथे होणार आहे. या सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष ॲड. राज आंब्रे, सचिव राजकुमार जैन, खजिनदार मिलिंद बारटक्के,जिल्हा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, संचालक राजेश तिवारी, किसन चव्हाण, मंदार अडीवरेकर, शिरीष चौधरी,विश्वास जोशी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
https://sagarwave.com
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
