चिपळूण : चिपळूण नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज चौक (चिंचनाका) ते पाग पॉवर हाऊस सागर प्रेस या मार्गाला दैनिक सागरचे संस्थापक संपादक नानासाहेब जोशी यांचे नाव दिले असून या नामफलकाचा अनावरण सोहळा उद्या स्वातंत्र्यदिनी सायंकाळी ५:00 वाजता राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.

चिपळूण पोलीस स्टेशनसमोर नानासाहेब जोशी नामफलकाच्या अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार भास्करशेठ जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेशभाई कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, नगराध्यक्ष उमेश सकपाळ व त्यांचे सहकारी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.