चिपळूण ः तालुक्यातील कोंढे येथील रिगल एज्युकेशन सोसायटी संचालित रिगल आयटीआय या महाविद्यालयात प्रवेशासाठी दि. 22 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ मिळाली असून विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात.
रिगल आयटीआय हे क्यू.सी.आय. दिल्ली मान्यता प्राप्त असे कोकणातील एकमेव आयटीआय कॉलेज आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी थेट इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थी सिव्हील ड्राफ्ट्समन व आर्किटेक्ट ड्राफ्ट्समन या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो.

वेल्डर या अभ्यासक्रमाला दहावी पास झालेला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. तसेच एक वर्षाचा डिझेल मेकॅनिक हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दहावी पास पात्रता आवश्यकता आहे. कम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट या अभ्यासक्रमाला दहावी पास झालेला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो.
या सर्व अभ्यासक्रमासाठी 22 ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत आहे. सुसज्ज कार्यशाळा, अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, भरपूर प्रॅक्टिकल्सचा यात समावेश आहे. मागील दहा वर्षात रिगल 2 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तरी विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करून आपले उज्वल भविष्य घडवावे असे आवाहन रिगल आयटीआयच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेशासाठी किंवा अधिक माहितीसाठी रिगल आयटीआय कोंढे येथे किंवा 8329104876, 7768988584, 9373621950 या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा.