खेड (प्रतिनिधी) : – चिपळूण तालुक्यातील पाली, निरबाडे व तालुक्यातील मुसाड, कुरवळ – खेड ते कुरवळ जावळी – या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून सर्वत्र मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवांची वाहतूक होत असल्याने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
मात्र रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेता अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने परिस्थिती आणखी बिकट होते आणि वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता वाढते.