चिपळूण : श्री क्षेत्र परशुराम येथील भगवान श्री परशुराम मंदिरात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री मनुज जिंदाल यांच्या अध्यक्षतेखाली परशुराम क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक संपन्न झाली. यावेळी संस्थान श्री भार्गवराम परशुरामचे अध्यक्ष श्री जीवन रेळेकर व विश्वस्त डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी श्री जिंदाल यांचे स्वागत केले.

बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच महसूल विभागाच्या प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मंदिर परिसरातील विकासकामे, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित रखडलेली कामे तसेच विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.

बैठकीस संस्थानचे अध्यक्ष श्री जीवन रेळेकर, विश्वस्त डॉ. प्रशांत पटवर्धन, विश्वस्त श्री संदीप थत्ते, सल्लागार श्री रामचंद्र वडके, चिपळूणचे उपविभागीय अधिकारी श्री आकाश लिगाडे, तहसीलदार श्री प्रवीण लोकरे, खेडच्या उपविभागीय अधिकारी सौ. वैशाली पाटील व तहसीलदार श्री सुधीर सोनवणे,सल्लागार श्री समीर देसाई उपस्थित होते.