चिपळूण : धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबई यांच्या वतीने चिपळूण तालुक्यातील तोंडली धनगरवाडी येथील रहिवासी श्री. रमेश शांताराम माने यांची चिपळूण तालुका अध्यक्षपदी एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप झोरे सर तसेच रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री. रामचंद्र आखाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून जाहीर करण्यात आली.
श्री. माने हे समाजकार्यात सक्रिय असून धनगर समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे तालुक्यात समाज संघटन अधिक मजबूत होईल, तसेच विविध समाजहिताचे उपक्रम प्रभावीपणे राबवले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच समाजबांधवांकडून श्री. माने यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
