चिपळूण : स्वकुळ साळी समाजातील प्रतिष्ठित काटकर कुळाचे कुलसंमेलन घोणसरे येथील खातुवाडा या पारंपरिक वास्तूमध्ये दि. ६ व ७ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या संमेलनासाठी नाशिक,मुंबई, ठाणे,कल्याण,चिकोडी,रत्नागिरी, दापोली,दाभोळ, इस्लामपूर व चिपळूण येथून मोठ्या संख्येने काटकर कुळातील बंधू-भगिनी उपस्थित होते.

संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी साळी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री जिव्हेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ बांधव शत्रुघ्नजी काटकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.ज्येष्ठ समाजसेवक डी.जी. निमकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले,तर स्वकुळ साळी समाज रत्नागिरी जिल्हाध्यक्ष शिरीषजी काटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

पहिल्या दिवशी उपस्थितांची ओळख,सामूहिक भोजन तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.महिलांसाठी शिवाजी मालवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धात्मक खेळ घेण्यात आले. या उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.