खेड

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असून उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांपैकी दोन उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे अवैध ठरल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

पंचायत समिती निर्वाचन गण क्रमांक १८ – तिसंगी येथून दाखल करण्यात आलेले श्री. राजेंद्र रामचंद्र जाधव यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरले आहे. तसेच पंचायत समिती निर्वाचन गण क्रमांक २७ – लोटे येथून श्री. सुभाष विश्राम हुमने यांचा अर्जही छाननीअंती अवैध घोषित करण्यात आला आहे.

खेड तालुक्यातील १४ पंचायत समिती जागांसाठी एकूण ७४ अर्ज, तर जिल्हा परिषदेच्या ७ गटांसाठी ३० अर्ज दाखल झाले होते. छाननीअंती हे सर्व एकूण १०४ अर्ज वैध ठरले असून निवडणूक रिंगण अधिकच रंगतदार बनले आहे.

आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, माघारीनंतर नेमकी लढत कोणामध्ये होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवल्याने खेड तालुक्यात निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻

🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY