चिपळूण (विशेष प्रतिनिधी): तब्बल २९ वर्षांपासून सातत्यपूर्ण मनोरंजन, खाद्य संस्कृती आणि गुणवत्तापूर्ण दर्जेदार वस्तूंचे भव्य दिव्य दालन उपलब्ध करून देणारा रोटरॅक्ट क्लब चिपळूणचा फन एन फेअर यंदाही प्रजासत्ताक दिनापासून सुरू होत आहे. २६ जानेवारीला सायंकाळी महोत्सवाचा भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
चिपळूणच्या बायपास रोड खेंड बावशेवाडी येथील विस्तीर्ण मैदानावर २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी असे तब्बल आठ दिवस फन एन फेअर रंगणार आहे. २६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन होईल. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चिपळूणचे आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाबूशेठ तांबे, रोट्ररॅक्टचे अध्यक्ष पलाश लाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जयपुर महालचे प्रवेशद्वार यंदाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. त्याशिवाय शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांचे स्वतंत्र दालन, आकाश पाळणा, बच्चे कंपनीच्या करमणुकीची साधने, बचत गटांचे स्टॉल्स, दर दिवशी रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम, विद्युत झगमगाट, स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य अशा वैशिष्ट्यांमुळे यंदाचा फन एन फेअर आगळावेगळा ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
‘या’ सात सदस्यांनी सुरू केला महोत्सव..
तीस वर्षांपूर्वी सध्याचे विद्यमान नगरसेवक फैसल कासकर यांच्या पुढाकारातून प्रसाद सागवेकर,शैलेंद्र सावंत, वैभव रेडीज, बाळा आंबुर्ले, राजेश ओतारी, प्रशांत देवळेकर या सात जणांच्या टीमने हा उपक्रम सुरू केला.यंदाही याच टीमच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव अत्यंत नियोजनपूर्वक आणि कल्पकतेने नटलेला असा होत आहे.
▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤 सागर Wave न्यूज 🎤👇🏻
https://sagarwave.com
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
