खेड : – लहान बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी रोहन शंकर पालकर, वय- २३ वर्षे, रा. खारी-सुसेरी, ता. खेड, जि. रत्नागिरी यास दि.६ मे २०२६ रोजी खेड येथील न्यायालयाने (जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. पी. एस. चांदगुडे) यांनी भा.द.वि. कलम ३७६ (२) (जे) (एन), ३७६ (एफ), ३७६ (३) (ए) ५०६ (ए), पोस्को ४, ५, ६, ८, १०, १२ खाली अन्वये दोषी धरुन शिक्षा ठोठावण्यात आली आहे.खेड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ५३८/२०२१ , सेशन केस नं. २/२०२२ प्रमाणे या गुन्ह्याची सुनावणी येथील जिल्हा न्यायालयात पार पडली.
सदरप्रकरणी सरकारी वकील ॲड. सौ. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजुने, युक्तीवाद करुन संपुर्ण केसचे कामकाज पाहिले. तपासिक अंमलदार श्रीमती सोनाली झेंडे महिला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे खेड तसेच कोर्ट पैरवी चंद्रमुनी ठोके यांचे अनमोल सहकार्य लाभले.
