खेड (प्रतिनिधी) : – कोकणचे सुपुत्र , सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा भाजपाचे ज्येष्ठ सहकारी प्रमोद जठार यांची महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली.

या निवडीनंतर भाजपा नेते, माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जंगी स्वागत करण्यात आले. व शासकीय विश्रामगृह (डाक बंगला) पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यासोबतच आदरणीय प्रमोद जठार यांच्या निमित्ताने पक्ष नेतृत्वाने कोकणाला संधी दिली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, दक्षिण तालुकाध्यक्ष विनोद चाळके, शहरध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, जेष्ठ नेते राजू भाई रेडीज, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष तथा गटनेते रहीमभाई सहिबोले, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, स्वप्नाली राकेश चव्हाण, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, राजेश जोयसर, राहुल पाटणे, माजी नगराध्यक्षा उर्मिला उदय पाटणे शेट्ये, माजी नगरसेविका आशा सनगरे, अक्षय सनगरे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, मंदार आपटे, विजय गुप्ता, ओवेस चौगुले, प्रणव मापुस्कर, स्वराज गांधी आदी उपस्थित होते.