खेड (प्रतिनिधी) : – दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये अथक परिश्रम घेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल येथील लायन्स क्लब यांच्यावतीने एम. आय. हजवाणी इंग्लिश मिडीयमचे चेअरमन बशीरभाई हजवाणी तसेच मुख्याध्यापिका सलवा तिसेकर यांचा सन्मान करण्यात आला.
. प्रशालेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देत दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षक व व्यवस्थापनाने घेतलेल्या मेहनतीची दखल घेत लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे,अविनाश दळवी,उत्तम कांबळे,संदीप मोरे, विनोद मोरे तसेच गोविंद राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळेने केलेल्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशीच शैक्षणिक प्रगती कायम राहावी, अशा शुभेच्छा दिल्या.