मुंबई : मा. उपमुख्यमंत्री तथा युवा व क्रीडा मंत्री सुनेत्राताई (वहिनी) पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्यमंत्री नामदार माधुरीताई मिसाळ यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहात पार पडलेल्या राज्यातील क्रीडामैदानांवर महिला खेळाडूंसाठी सुरक्षित व सुसज्ज सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात आयोजित बैठकीस उपस्थित राहिले.

बैठकीत ग्रामीण व निमशहरी भागातील महिला खेळाडूंना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले. अनेक ठिकाणी स्वतंत्र व सुरक्षित स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम, फ्लडलाईट व्यवस्था तसेच सीसीटीव्ही व सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसल्याने महिला खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः असुरक्षित वातावरण आणि लैंगिक छळाच्या भीतीमुळे अनेक मुली सरावाचा वेळ कमी करतात, काही जणी क्रीडा क्षेत्रापासून दूर जातात, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी एकसमान “महिला क्रीडा सुरक्षा धोरण (Women Sports Safety Policy)” लागू करणे, तसेच प्रत्येक क्रीडांगणावर महिला खेळाडूंसाठी आवश्यक मूलभूत सुविधा बंधनकारक करण्याची मागणी बैठकीत मांडली.

या बैठकीत पुढील मान्यवर उपस्थित होते :

▪️ मा. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग
,नगरविकास विभाग,सामान्य प्रशासन विभाग,महसूल विभाग
▪️ मा. प्रधान सचिव, क्रीडा विभाग
विधी व न्याय विभाग,
▪️ मा. सहआयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका
▪️ मा. सचिव, नियोजन विभाग
महिला व बालविकास विभाग,ग्रामविकास विभाग
▪️ मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा
▪️ तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी होते सोबत विधीमंडळातील सहकारी आमदार मिलींदजी नार्वेकर ही उपस्थित होते.