चिपळूण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस चिपळूणमध्ये विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. बॅनर व होर्डिंग्जचा वापर टाळून मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी एकाच दिवशी अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले.

मंदिरात होमहवन करून राज ठाकरे यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच महामार्गालगत आणि गावागावांत वृक्षारोपण, रिक्षा व्यावसायिकांना मोफत सीएनजी वाटप, विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण आदी उपक्रम राबविण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मनसे वाहतूक सेनेचे खेड तालुकाध्यक्ष शशिकांत उर्फ पप्पू आंबरे, चिपळूण तालुकाध्यक्ष मिलिंद कदम, माजी महिला तालुकाध्यक्ष संजीवनीताई शिंदे, सुनील मोडक, भाई सुर्वे, राजेंद्र उंडरे, राजेंद्र गोंजारी, विनोद चिपळूणकर, जया जाधव, संजय वाजे, बाबू देसाई, मनोज सोळंके, साहिल मणियार, आसिफ मुल्ला, अफजल खान, इटकर चौगुले, साहिल खेतले आदी मान्यवर उपस्थित होते.