रत्नागिरी : शनिवार दि. 27 जून रोजी दुपारी 12.30 वाजता वाशी, नवी मुंबई येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण. सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन पदाधिकारी बैठक (स्थळ : हॉटेल विवेक, माळनाका). रात्रौ शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव.
रविवार दि. 28 जून रोजी सकाळी 8 वाजता राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिम कार्यक्रम सत्राच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : जिल्हा शासकीय रूग्णालय ). सकाळी 8.30 वाजता कोंकण कोस्टल हाफ मॅरेथॉन २०२७ प्रॅक्टीस रन व सन्मान सोहळ्यास उपस्थिती (स्थळ : जयेश मंगल कार्यालय, थिबा पॅलेस रोड ) सकाळी 10 वाजता मुंबई गोवा महामार्गावर तळेकांटे सप्तलिंगी ते बावनदी या मार्गावर दुतर्फा झाडे लावण्याचा उपक्रमास उपस्थिती (स्थळ : मुंबई गोवा महामार्ग, तळेकांटे (बावनदी) पोस्ट ऑफिस जवळ, ता. संगमेश्वर) ) सकाळी 11 वाजता निर्मल व पर्यावरण समृध्द ग्रामपंचायत पांगरी येथील नूतन ग्रामपंचायत इमारत बांधणे व विस्तारित करणे या कामाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती (स्थळ : मौजे पांगरी, ता. संगमेश्वर) दुपारी 3 वाजता कुपोषित बालकांसंदर्भात आढावा बैठक (स्थळ : जिल्हा परिषद, रत्नागिरी) दुपारी 4 वाजता
जिल्हा परिषद शाळा दुरूस्ती व शाळा वर्गखोली बांधकाम याबाबत आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय ) सायंकाळी 5 ते 7 वाजता भेटीसाठी राखीव (स्थळ : संपर्क कार्यालय, जयस्तंभ ) रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव. रात्रौ 11.30 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कोंकणकन्या एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण.