पनवेल : येथील महापालिकेच्या महापौरपदासाठी जोरदार राजकीय हालचालींना वेग आला आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी हे पद आरक्षित झाल्याने शेतकरी कामगार पक्षातून आलेले नितीन पाटील आणि काही महिन्यांपूर्वी याच पक्षातून कमळ हातात घेतलेल्या ममता म्हात्रे ही दोन नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. मात्र आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी सातत्याने एकनिष्ठ राहिलेल्या इतर नगरसेवकांनाही संधी दिली जाणार का, याकडे पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.
१० फेब्रुवारीला महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ या चिन्हांवर निवडून आलेल्या एकूण ५९ नगरसेवकांनी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळवून दिले आहे. यामध्ये सर्वात आधी बिनविरोध गटनेते म्हणून निवडून आलेल्या नितीन पाटील यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महापौरपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण निघाल्यामुळे नितीन पाटील आणि ममता म्हात्रे हे प्रमुख दावेदार म्हणून पुढे आले आहेत. परेश ठाकूर यांनी निवडणूक न लढवल्यामुळे या दोघांसाठी संधी खुली झाली आहे. मात्र, गटनेतेपद मिळूनही नितीन पाटील यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडेल की नाही, याबाबत अद्याप शाश्वती नाही.
- लवकरच अंतिम निर्णय
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे महापौर व उपमहापौर निवड १० फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. महायुतीची अधिकृत नोंदणी कोकण विभागीय आयुक्तांकडे होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालानंतर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या सल्ल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अंतिम निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. - एकूण संख्येत अपक्ष उमेदवार वगळला!
आमदार विक्रांत पाटील यांच्या भगिनी स्नेहल स्वप्नील ढमाले यांनी प्रभाग क्रमांक १८ मधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या प्रभागात भाजपकडून एबी अर्ज दिलेल्या उमेदवारांनी माघार घेतल्याने स्नेहल ढमाले बिनविरोध निवडून आल्या, मात्र भाजपकडून एकूण नगरसेवक संख्येमध्ये अपक्ष उमेदवाराला स्थान देण्यात आलेली नाही.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
