चिपळूण (विशेष प्रतिनिधी):चिपळूण नगर परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या नारायण तलाव येथे ३० जानेवारी या दिवशी सायंकाळी
विशिष्ट समाजातील सात ते आठ लोकांनी सामूहिकपणे धार्मिक प्रार्थना अदा केली. या आरोपावरून शहरात हिंदू संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या असून त्यांनी आज सोमवारी दुपारी नगराध्यक्ष उमेश सपकाळ आणि पोलीस निरीक्षक मेंगडे यांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. अशी माहिती गोरक्षक विक्रम जोशी यांनी दैनिक सागरशी बोलताना दिली.

गोरक्षक श्री जोशी यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला माहिती देताना सांगितले की ३० जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास एका महिलेने काही लोकांना नारायण तलावावर धार्मिक प्रार्थना अदा करताना पाहिले तेव्हा ही सार्वजनिक जागा असून येथे अशी कृती करू नये, असे सांगूनही हे लोक ऐकले नाहीत. त्यामुळे घटनेची दखल घेऊन आज चिपळूण मधील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी एकत्र येऊन नगराध्यक्ष श्री उमेश सकपाळ यांना संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन दिले. यावेळी श्री उमेश सकपाळ यांनी संपूर्ण माहिती घेऊन हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करणार करणार, असे आश्वासन दिले. अशी माहिती गोरक्षक विक्रम जोशी यांनी दिली.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी यासंबंधी चिपळूण पोलीस निरीक्षक मेंगडे यांचीही भेट घेऊन निवेदन दिले. तसेच याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या संघटनांसोबत समस्त हिंदू राष्ट्र समन्वय समितीतर्फे नगराध्यक्ष आणि पोलिसांना निवेदन देण्यात आले. यावेळी पालिकेचे पाणीपुरवठा सभापती निहार कोवळे यांनीही संपूर्ण वस्तुस्थिती नगराध्यक्षांना कथन केली. यावेळी नगरसेवक शशिकांत मोदी हेही उपस्थित होते अशी माहिती गोरक्षक विक्रम जोशी यांनी दिली. याबाबत नगराध्यक्ष आता सीसीटीव्ही फुटेज तपासणार असून नारायण तलावावर येणाऱ्या नागरिकांसाठी सूचना देणारे फलक उभारण्यात येतील असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले अशी माहिती विक्रम जोशी यांनी दिली. यावेळी हेमंत चाळके, मंदार लेले ,अमित जोशी, नगरसेवक कपिल शिर्के, तसेच सारिका भावे,शिल्पा केतकर,विश्वास शितळे आदी हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे कार्यकर्ते ही उपस्थित होते.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY