मुंबई -चिपळूण : मतदारसंघातील विविध विकासकामांच्या संदर्भात आमदार शेखर निकम यांनी आज मुंबई येथील देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, विविध पायाभूत सुविधा प्रकल्प तसेच नागरिकांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रस्तावांबाबत सकारात्मक विचार व्हावा, तसेच प्राधान्याने निधी उपलब्ध करून कामांना गती मिळावी, अशी मागणी आमदार निकम यांनी यावेळी केली. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सर्व विषयांची सविस्तर माहिती जाणून घेत संबंधित कामांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.

मतदारसंघातील विकासकामांना अधिक वेग देण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असून, नागरिकांच्या हिताच्या प्रत्येक प्रश्नासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार शेखर निकम यांनी यावेळी सांगितले.