देवरुख : शहरातील नागरिकांना गेले तीन दिवस गढूळ पाणी पुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शहरातील नळधारकांना त्वरीत स्वच्छ पाणी पुरवठा करावा.अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा संगमेश्वर शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद पवार यांनी दिला आहे.
देवरुख शहरात तीन दिवस नळाला गढूळ पाणी येत आहे यावर त्वरीत उपाय योजना करण्यात नगरपंचायत प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असताना सत्ताधारी मित्र पक्ष शिवसेनेकडूनच न. प विरोधात आंदोलन करण्याचा इशारा तालुका प्रमुखांकडूनच दिला गेल्याने महायुतीत आलबेल नसल्याचे स्पष्ट दिसत आहे..
चार दिवसांपुर्वी अचानक पडलेल्या पावसानंतर देवरुख या शहरातील न. प. च्या नळपाणी योजनेतून नळातून गढूळ पाणी पुरवठा सुरू झाला तरी यावर त्वरित सुरू उपाय योजना करुन स्वच्छ पाणी पुरवठा अपेक्षित असताना गत तीन दिवस शहरातील नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असून ही न. प प्रसासन मात्र सुस्त असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
आधीच बदते हवामान व त्यात गढूळ पाणी पुरवठा. यातच वाढलेल्या डासांचा प्रादुर्भाव यामुळे शहरात साथीचे आजार आहे पसरण्याची शक्यता असताना ही न. प प्रशासनाला या गंभीर समस्येवर उपाय योजना करण्यात अपयशी ठरलेने नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.