खेड : शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या परिवर्तनकारी समाजकारणाने प्रेरित होत घेरारसाळगड गावातील अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा नामदार श्री. योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी श्री. रामचंद्र बाबू आखाडे, श्री. धोंडीराम बाबू आखाडे, श्री. रामचंद्र दिनकर सावंत, श्री. सुभाष गंगाराम सावंत यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश करत पक्षकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमास जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अस्मिता केंद्रे, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, जिल्हा परिषद सदस्य श्री. किशोर देसाई, श्री. अमित कदम, युवासेना तालुकाप्रमुख श्री. मिलिंद काते, श्री. विश्वास कदम, श्री. राजेंद्र शेलार तसेच इतर पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घेरारसाळगड येथील ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश !
