खेड : – येथील रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी विज्ञान ऑलिंपियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल हिंदी ऑलिंपियाड (आय.एच.ओ) परीक्षेत १७ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावून शाळेच्या नावलौकिकात भर टाकली.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्था चेअरमन श्री बिपिन पाटणे, मुख्याध्यापिका सौ. भुमिका पटेल यांनी व सर्व पदाधिका-यांनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शालेय विद्यार्थ्यांसाठी हिंदी विषयावर आधारित दरवर्षी इंटरनॅशनल हिंदी ऑलिंपियाड (आय.एच.ओ) परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून अनेक विद्यार्थी प्रविष्ठ होतात. रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्रविष्ठ होऊन जिदद् व चिकाटीच्या बळावर अभ्यासाची उत्तम तयारी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. इंटरनॅशनल हिंदी ऑलिंपियाड (आय.एच.ओ) परीक्षेतील सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये कु. आरुष हरावडे, कु. आराध्या कासार, कु. अनन्या पाटील, कु. सार्थक खेडेकर, कु. विधी तटकरी, कु. स्तवन जाधव, कु. आहाना बुटाला, कु. वैभव अग्रहारी, कु. हिबा खान, कु. पारस खोपकर, कु. समर्थ खडपेकर, कु. श्रेयश आलेगावकर, कु. हर्ष सगरे, कु. परीजा कदम, कु. हेमांग मेंढे, कु. अर्णव पिल्लई, कु. स्मित तांबे या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य सुवर्णपदक प्राप्त केले आहे. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व हिंदी विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
खेडमधील रोटरी स्कूलच्या १७ विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल हिंदी ऑलिंपियाड परीक्षेत सुवर्णपदक !
