लांजा : शहरातील मूलभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी प्रभागनिहाय आढावा बैठका सुरू केल्या आहेत. प्रभाग क्रमांक २ मध्ये झालेल्या बैठकीत नागरिकांनी पाणी तुंबणे, विजेचा अनियमित पुरवठा आदी समस्या मांडल्या. आमदारांनी तात्काळ संबंधित विभागांना सूचना देत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या समस्या जलद गतीने सोडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
लांज्यात प्रभागनिहाय आढावा बैठका; नागरिकांच्या समस्यांवर आमदार किरण सामंत यांचा भर
