चिपळूण : चिपळूण वाशिष्ठी नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईला मगरीच्या तावडीतुन सोडवून आणणार्या दहा वर्षाच्या स्वर्णी चा चिपळूण जिजाऊ ब्रिगेड तर्फे तिच्या राहत्या घरी गणेश वाडी वालोपे येथे जाऊन तिच्या धाडसाचे कौतुक करून गौरविण्यात आले.
तसेच त्यादिवशी झालेला प्रसंग आणि तिने दाखवलेलं धाडस हे तिने व तिच्या आई आम्हाला सांगितले. नशीब बलवत्तर म्हणून ती माऊली वाचली आई साठी जीव धोक्यात घालून कु. स्वर्णी भुपेंद पवार इयत्ता पाचवी हिने खुप शौर्याचे काम केलं आहे.
आज सर्वत्र तिचं कौतुक होता दिसत आहे.
चिपळूण जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व जिल्हा तालुका शहर पदाधिकारी कार्यकर्त्या यांनी तिचं व तिच्या धाडसाचे भरभरून कौतुक केलं आणि तिला खुप सारया मनापासून शुभेच्छा दिल्या.
स्वर्णी ला सन्मान चिन्ह देऊन तिचा गौरव करत्यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्या
जिल्हा अध्यक्ष स्नेहल ताई चव्हाण जिल्हा सचिव पुर्वा ताई तांदळे तालुका संघटक सुकन्या ताई चव्हाण खेड तालुका अध्यक्ष रोहिणी ताई मोरे शहर अध्यक्ष वर्षा खटके पाटील शहर उपाध्यक्ष अपुर्वा ताई गायकवाड शहर कार्याध्यक्ष प्रिती ताई साळवी शहर सचिव माया ताई जाधव शहर संघटक दिलबर ताई खान वरिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई चाळके तसेच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती ताई कदम या सर्व जिजाऊंच्या लेकींचीं उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे आयोजन शहर जिजाऊ ब्रिगेड यांनी केले आहे.
मगरीच्या तावडीतून आईला वाचवणाऱ्या स्वर्णीचा जिजाऊ ब्रिगेडतर्फे गौरव
