मंडणगड : पंचायत समिती सभापती पदी तसेच उप सभापती यांची निवड प्रक्रीया पुर्ण करण्याकरिता 9 मार्च 2026 रोजी पंचायत समिती मंडणगड येथे पिठासीन निवडणुक निर्णय अधिकारी विरसींग वसावे, यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक कार्यक्रम राबविण्यात आला. सकाळी अकरा वाजता निवडणुक नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली.

दुपारी तीन वाजता पंचायत समिती सभागृहात राबविण्यात आलेल्या निवड प्रक्रीयेस निवडणुक निर्णय अधिकारी विरसींग वसावे गटविकास अधिकारी सुनील खरात, महसुल मंडळ अधिकारी निलेश गोडघासे, वामन मेंढे व पंचायत समितीचे कर्मचारी पंचायत समिती सदस्या सौ प्रणाली चिले सौ दिप्ती घडशी पंचायत समिती सदस्य दिपक मालुसरे अनिल रटाटे उपस्थित होते. तीन ते सव्वातीन या वेळेत नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. दाखल झालेली दोन्ही नामनिर्देशन पत्रे वैध ठरल्याने निवडणुकीत माघार घेण्याचा पंधरा मिनिटांचा वेळ संपल्यावर निवडणुक निर्णय अधिकारी विरसींग वसावे यांनी मंडणगड पंचायत समितीचे सभापतीपदी सौ. प्रणाली चिले, तर उपसभापती दीपक मालुसरे यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा करुन दोघांनाही निवडीचे प्रमाणपत्र दिले.
यानंतर नवनिर्वाचीत सभापती व उपसभापती सभागृहाचे दालनात गेले व त्यांचे खुर्चीत स्थानापन्न होत आपल्या कामाचा पदभार स्विकारला यावेळी माजी सभापती आदेश केणे, अनंत लाखण, रामदास रेवाळे, जिल्हा परिषद सदस्या अस्मिता केंद्रे, प्रताप घोसाळकर, संदेश चिले विभागप्रमुख इरफान बुरोंडकर, नितीन म्हामुणकर जितेंद्र दवंडे, संजय शेडगे, आनंद भाटे, अनंत शिंदे, अमिता शिंदे, सिध्देश देशपांडे, संतोष पार्टे, विकास पवार, मंगेश पवार यांच्यासह तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी युवासैनिक महिला आघाडी कार्यकर्ते व विविध खात्याचे अधिकारी सामाजीक संघटनांचे पदाधिकारी तथा नागरीक मोठ्या उपस्थित होते. सर्वानी नवनिर्वाचीत सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन केले.
चौकट
शिवसेनेने विरोधकांना व्हाईट वॉश देत यंदा नवा इतिहास घडविल्याने सभापती व उपसभापती पद कोणाला मिळणार या विषयी तालुक्यास कमालीची उत्सुकता होती मात्र या निवडीचे पुर्व संध्येलाच शिवसेना नेतृत्वाने निवड केलेल्या पंचायत समिती सदस्यांचे निवडीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे सहीचे पत्र समाज माध्यमात व्हायरल झाल्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सभापती व उपसभापती पदी कोण बसणार याची पुरेसी स्पष्टता तालुक्यास आलेली होती त्या आधी तालुका कार्यकारिणीच्या सभेनंतर याच नावांची चर्चा होती निवडीचे प्रशासकीय सोपस्कर पुर्ण झाल्यावर यंत्रणेने केलेल्या घोषणानेनंतर तालुक्यातील शिवसैनीक कार्यकर्त्यांना मोठा जल्लोष केला. पांरपारीक खालु बाजाच्या आवाजाने परिसर दणाणून सोडला

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/EFaOfIev7el2gqFo2TPX75