चिपळूण : महाराष्ट्रातील लोकप्रिय एनडीटीव्ही मराठी मधे न्यूज अँकरिंग करीत म्हणून नेमणूक असलेल्या चिपळूणची कन्या ऋतुजा सतीश कदम हिचा भाजपा शहर मंडल यांच्या वतीने आयोजित मान्यवर,चेअरमन,संचालक मंडळींच्या सत्कार सोहळ्यात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सीईओ सौ.स्वप्ना प्रशांत यादव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आणि माजी मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री व खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील मान्यवर,चेअरमन,संचालक यांच्या सत्कार कार्यक्रमाचे शहर मंडलच्या वतीने शहरातील ब्राह्मण सहायक संघ येथे शनिवारी आयोजन करण्यात आले होते.चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण,सीइओ सौ.स्वप्ना यादव, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे,यांच्यासह अनेक मान्यवरांचा भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी यांनी केले.सत्कार सोहळा यशस्वी होण्यासाठी भाजपा सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता पालकर, निखिल किल्लेकर यांनी केले.तर अभय चितळे यांनी आभार मानले.
