पेण (प्रशांत पोतदार) : भाजपचा स्थापना दिन पेण कार्यालयात जोरदार साजरा करण्यात आला. माजी खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती स्मिता पाटील आणि उपसभापती संजय डंगर यांनी ध्वजवंदन केले. यावेळी धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, भाजप ४६ वर्षांपासून समाजातील शेवटच्या घटकाचा उदय करण्यासाठी काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विकासात्मक कामे चालू असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार धैर्यशील पाटील, जि.प. सदस्य प्रभाकर म्हात्रे, सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, पंचायत समिती गटनेते विवेक म्हात्रे, नगरपालिका गटनेते अनिरुद्ध पाटील, वाशी सरपंच संदेश ठाकूर, बाजार समिती सभापती महादेव मानकर, नगरसेवक निळकंठ म्हात्रे, नगरसेवक मितेश शहा, रवींद्र म्हात्रे, परशुराम पाटील, सुरेश पाटील, आर. बी. पाटील, मच्छिंद्र म्हात्रे, राजन पाटील, अमित पाटील, प्रशांत पाटील, दिनेश शेलार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पेणमध्ये भाजपचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा
