चिपळूण : येथील सजग स्वास्थ क्लिनिकच्या वर्धापन दिनानिमित्त विविध आरोग्य प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 2014 रोजी सुरू झालेले सजग स्वास्थ्य क्लिनिकला यावष बारा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आज दि.11 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आरोग्याशी निगडित समस्या घेऊन प्रबोधन करण्याचा प्रयत्न सजगचा प्रयत्न असतो. विविध वयोगटातील रुग्णांसाठी आरोग्यदायी उपक्रम, लेखमाला जनजागृतीपर व्याख्यान क्लीनिकच्या मार्फत आयोजित केले जात असतात. चिपळूणच्या डॉक्टरांसाठी माईंड युवर मेटबॉलिझम हा परिसंवाद लाईफ केअर हॉस्पिटल येथे 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त पार पडला.
आधुनिक काळात जेन झी, जेन अल्फा आणि पुढील पिढीतील मुलांचे पालकत्व अधिक गुंतागुंतीचे व आव्हानात्मक होत चालले आहे. आभासी जगाचा वाढता प्रभाव, तीव्र स्पर्धा आणि बदलता सामाजिक वातावरण यामुळे पालकांसमोर नवनवीन प्रश्न उभे राहत आहेत. या पार्श्वभूमीवर पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि सकारात्मक, खेळीमेळीच्या वातावरणात विवेकी पालकत्वाची संकल्पना उलगडण्यासाठी पुणे येथील ज्येष्ठ अनुभवी पालक समुपदेशक वैशाली वहिकर या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
दि. 12 एप्रिल रोजी सायंकाळी 5-7 जीवनशैलीचे आजार याबद्दल प्रबोधनात्मक जनजागृतीपर परिसंवाद सर्व चिपळूणकरांसाठी ब्राह्मण सहाय्यक संघ येथे होणार आहे. या दिवशी डॉ सुनील कोतकुंडे विविध आरोग्य चाचण्या व त्या का कराव्यात त्याचे महत्व सांगणार आहेत. तर डॉ श्रुतिका कोतकुंडे आहार, झोप व ताण याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. त्याच बरोबर नेत्रतज्ञ्‌‍ व क्रीडापटू डॉ मनीषा वाघमारे या व्यायामा संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
दि. 13 एप्रिल रोजी यवतमाळचे प्रसिद्ध नाक कान घसा तज्ञ डॉ अनिल पटेल सकाळी 10:30-12:30 या वेळेत वडनाका येथे तर दुपारी 1:30-3:30 लाईफ केर हॉस्पिटल येथे नाक कान घसा आरोग्य शिबीर घेणार आहेत. तरी सर्व चिपळूणकरांनी या विविध आरोग्य उपक्रम जनजागृती मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सजग स्वास्थ्य क्लिनिकच्या डॉ कोतकुंडे दाम्पत्य यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क सजक स्वास्थ्य क्लिनिक 02355 260200 या नंबरवर संपर्क साधावा.