मुंबई : भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष दीपक सिंह यांनी जाहीर केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या यादीप्रमाणे विराज कुलकर्णी यांची भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ते प्रदेश भाजपा कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांचे सुपुत्र आहेत. मुंबईतील के.सी. कॉलेजमधून त्यांनी पदवी प्राप्त केली असून त्यानंतर त्यांनी लंडन येथून मास्टर्स पदवी मिळवली आहे.

विनम्र, शालीन आणि सुशिक्षित असलेले विराज कुलकर्णी यांनी दिलेल्या जबाबदारीबद्दल आभार मानून सांगितले की, ते पूर्ण समर्पणाने पक्षाच्या विकासासाठी सातत्याने कार्य करतील.