कल्याण :कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आले. मात्र निवडून आल्यापासून कल्याण मधील मनसेतून ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक राहुल कोट आणि नगरसेविका स्वप्नाली केणे, तर शिवसेना शिंदे गटातील ठाकरे गटातून निवडून आलेले मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे नगरसेवक देखील बेपत्ता होते. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना पक्षाच्या बैठकीला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र या बैठकीला आणि कोकण विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणीला देखील हे चारही नगरसेवक गैरहजर राहिल्याने ठाकरे गटाने त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी दिली होती.
पक्षाने कारवाई सुरु केल्यानंतर अखेर हे चारही नगरसेवक आपल्या घरी परतले असून, कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार दिला आहे. तर आज महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी हे नगरसेवक उपस्थित राहणार असल्याचे समजते.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY