चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी (सती ) या विद्यालयाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने आयोजित इ . ४ थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यानी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या यशस्वी परंपरेला नवे सुवर्णपान जोडले आहे . या परीक्षेसाठी विद्यालयातील २६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होती . त्यांनी गुणवत्तेची नवी उंची गाठत स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
यामंध्ये कु दुर्वांक अविनाश शिंदे याने जिल्हा गुणवता यादीत ७७ वा येण्याचा बहुमान मिळवला आहे तर जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादित कु शौर्य दिपक पोटे – १२१ वा व कु साश्रिक नितिन ठसाळे – १२४ वा येण्याचा बहुमान मिळवला . शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षांची सवय लागावी यासाठी विशेष नियोजन केले जाते. यामध्ये नियमित सराव परीक्षा, मार्गदर्शन वर्ग, तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास करणारे उपक्रम विद्यालयात नियमित राबविण्यात येतात.विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत सातत्यपूर्ण अभ्यास पालकांचे मार्गदर्शन तसेच शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन याचा मोठा वाटा आहे .विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय आमदार शेखरजी निकम साहेब कार्याध्यक्ष श्री अनिरुद्ध निकम सर ,सेक्रेटरी श्री .महेश महाडीक सर ,संस्थेचे पदाधिकारी ,शाळेचे मुख्याध्यापक श्री .अरविंद सकपाळ सर व शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
