सावर्डे : कृषी दिनानिमित्त आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम यांच्या नेतृत्वाखाली सावर्डे येथे मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकात (डिव्हायडर) पामची सुमारे ४०० झाडे लावण्यात आली. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक झाडावर सावर्डे येथील व्यावसायिक, ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांच्या नावाची नेमप्लेट लावण्यात आली असून, प्रत्येकाने आपल्या नावाचे झाड जपण्याची व त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या प्रसंगी सावर्डे परिसरातील पोलिस विभाग, ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक, उद्योजक, महिला भगिनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाला चालना देणारा आणि लोकसहभागातून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येकापर्यंत पोहोचवणारा हा स्तुत्य व अभिनव उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम यांच्या नेतृत्वाखाली सावर्डे येथे मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकात (डिव्हायडर) पामची सुमारे ४०० झाडे लावण्यात आली….
