चिपळूण : दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘फोर्थ नॅशनल बार अँड बेंच बॅडमिंटन चॅम्पियनशिप’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत चिपळूणचे अॅड. विश्वास शिंगवण यांनी लक्षवेधी कामगिरी करत दोन ब्राँझ पदकांची कमाई केली आहे.
अॅड. शिंगवण यांनी मेन्स सिंगल्स (वयोगट ५० वर्षांवरील) आणि मेन्स डबल्स (वयोगट ५० वर्षांवरील) या दोन्ही गटांत ब्राँझ पदक पटकावत देशाच्या राजधानीत चिपळूणचा नावलौकिक वाढवला आहे. या यशामुळे चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
वय हा केवळ एक आकडा असून जिद्द व सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर राष्ट्रीय पातळीवरही उल्लेखनीय कामगिरी करता येते, हे अॅड. शिंगवण यांनी आपल्या खेळातून सिद्ध केले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल स्थानिक बॅडमिंटन ग्रुपसह समस्त चिपळूणकरांतर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा
चिपळूणच्या शिरपेचात मानाचा तुरा – अॅड. विश्वास शिंगवण यांची राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी पदकांची कमाई..
