मुंबई : पुण्यातील भोर तालुक्यातील एका गावातील सबस्टेशनच्या प्रश्नावर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. या प्रश्नामुळे भोर तालुक्यातील अनेक गावांवर परिणाम होण्याची शक्यता असून, मुख्यमंत्री यांनी याबाबत अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे
सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,भोरकर म्हणून सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन या विषयावर चर्चा करण्यात आली असून, पुन्हा एकदा बैठक घेण्याचे ठरले आहे,भाजपमध्ये असलेले संग्राम थोपटे, तसेच स्थानिक आमदार दादा गटाचे असतानाही आंदोलन करणारे दादा गटाचे कार्यकर्ते आमच्यासोबत उभे राहिले. त्याबद्दल मनापासून मी त्यांचे आभार मानते.असे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,विजय वडेट्टीवार यांनी संबंधित विषयावर स्पष्टीकरण दिले असून, आता या विषयावर पडदा टाकूया,राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रत्येकाने संवेदनशीलपणे बोलावे, जेणेकरून अशा प्रकारचे वाद निर्माण होणार नाहीत,झालेल्या टीकेकडे महिला म्हणून पाहत नसून, आपण एक लोकप्रतिनिधी आहे, मतदारसंघातील जनतेने आपल्यावर विश्वास टाकला आहे आणि त्या जबाबदारीने आपण काम करत आहे,काँग्रेसमधील अंतर्गत प्रश्न हा त्या पक्षाचा विषय असून, केंद्रातील आणि राज्यातील काँग्रेस याबाबत काय भूमिका घेतील हा त्यांचा निर्णय आहे, असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये बोलण्याची ताकद असेल तर समोरच्याचे म्हणणे ऐकण्याचीही ताकद असली पाहिजे,सत्तेत आज कोण आहे आणि कोणाच्या काळात पेपर फुटत आहेत, याला महत्त्व आहे. मात्र त्यापेक्षा आपल्या मुलांच्या आयुष्याचा हा प्रश्न असल्याने हा विषय हलक्यात घेऊ नये, असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
नेपाळमधील परिस्थितीबाबत बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,या संदर्भात सर्वजण संपर्कात असून, हा राजकीय विषय नाही ,सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातील,असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.
